होळी निबंध | Holi Nibandh
होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये होळीला ' शिगमा ' असेही म्हणतात. होळी सणाची सुरुवात होलिका दहनाने होते. असे मानले जाते की, याच दिवशी भगवान विष्णू यांचा भक्त प्रल्हाद याला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिका देवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी अख्यायिका प्रचलित आहे.
होळी हा सण दोन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होलिकादहन केले जाते. या दिवशी लोक लाकडे व गोवऱ्या गोळा करून संध्याकाळी होळी पेटवतात व होळीची पूजा करून नाचत गाजत होळीला प्रदक्षिणा घालतात. या दिवशी पुरणपोळी बनवतात. होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुळवड असेही म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. होळी हा सण रंग लावून साजरा करतात म्हणून होळीला रंगाचा उत्सव म्हणतात. तर असा हा होळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. म्हणून मला हा सण खूप आवडतो.
0 टिप्पण्या