माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध
ऋतूंचा राजा म्हणून ओळखला जाणारा उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे. जरी उन्हाळ्यात तीव्र उष्णता असते, तरीही त्यात अनेक आनंददायी गोष्टी आहेत. उन्हाळा म्हणजे सुट्टी, मित्रांसोबत खेळणे आणि निसर्गाचा आनंद घेणे.
उन्हाळा हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचा असतो. पण या महिण्यांपैकी एप्रिल आणि मे हे दोन महिने जास्त गरम असतात. उन्हाळ्यात सुरू पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्यामध्ये दिवस मोठे व रात्र लहान असते.
उन्हाळ्यात उन्हाची सुरुवात होळी या सणानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलेजांना सुट्ट्या असतात त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो.
सकाळच्या वेळी उन्हाचा मंद प्रकाश आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट मला दिवसाची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. उन्हात फिरणे, सायकल चालवणे आणि मैदानावर क्रिकेट खेळणे मला खूप आवडतं.
हे पण वाचा 👇
उन्हाळ्यात अनेक रंगीबेरंगी फुलं उमलतात. मंदार, गुलाब आणि सूर्यफूल यांच्या सुगंधाने वातावरण सुगंधी बनते. उन्हाळ्यात येणाऱ्या अब्यासारख्या रसाळ फळांची मला खूप आवड आहे. आंबा, टरबूज, खरबूज यासारख्या फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेचा सामना करण्यासाठी मदत होते.
शाळा बंद असल्यामुळे मला मित्रांसोबत खेळण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. अम्मी समुद्रकिनारी भेटी देतो, जलतरण ( पोहणे ) करतो आणि वाळूचे किल्लेही बनवतो. उन्हाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये ही मी सहभागी होतो.
- अधिक माहिती साठी पुढील व्हिडिओ पहा 👇
0 टिप्पण्या