माझी शाळा सुंदर शाळा निबंध 10 ओळींमध्ये
1. माझ्या शाळेचे नाव आदर्श माध्यमिक विद्यालय (तुम्ही शिकत असलेल्या शाळेचे नाव या ठिकाणी टाकावे) आहे.
2. माझ्या शाळेची इमारत खूप उंच आणि भव्य आहे.
3. माझ्या शाळेच्या समोर मोठे मैदान आहे.
4. शाळेच्या मैदानावर रोज सकाळी परिपाठ होतो.
5. माझे शाळेत अनेक मित्र आहेत , ज्यांच्या सोबत मी अभ्यास करतो व खेळ खेळतो.
6. माझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
7. माझ्या शाळेत मोठे ग्रंथालय आहे. तेथे अभ्यासाची व अभ्यासाव्यतिरिक्त बरीचशी इतर माहितीची पुस्तके आहेत.
8. माझ्या शाळेत विज्ञान प्रयोगशाळा देखील आहे जिथे विज्ञानाचे विविध प्रयोग शिकवले जातात.
9. माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते.
10. शाळेत नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्यामुळे मला शाळेत जायला खूप आवडते.
0 टिप्पण्या