शहीद दिन भाषण | Shahid Din Bhashan Marathi

शहीद दिन भाषण | Shahid Din Bhashan



अध्यक्ष महोदय पुज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो ....

स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह , राजगुरू आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा , देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुत देणार एक चेहरा समोर येतो. भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी  1931 मध्ये लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाचा स्मरणार्थ संपूर्ण देशभरात 23 मार्च 1931  हा दिवस शहीद दिन म्हणून मानला जातो.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरू (Rajguru), आणि सुखदेव (Sukhdev) ही नावे त्यात अग्रणी आहेत. इंग्रजी सरकारच्या 'पब्लिक सेफ्टी बिल अँड ट्रेड डिस्ट्रीब्यूशन बिल' च्या विरोधात भगतसिंह यांनी सेंट्रल असेंबली मध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केल.

लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या झाडल्या. नंतर भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली होती. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून मानला जातो. 

भगतसिंह लहान असताना 1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी शस्त्राच्या बळावर इंग्रजी व्यवस्था उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. भगतसिंहावर रशियन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. भारतातही स्वांतत्र्यांनंतर समाजवाद रुजला जावा यासाठी ते प्रयत्नशील होते. ते केवळ एक क्रांतीकारक नव्हते तर एक विचारक देखील होते. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली.

आजच्या जगात अनेक समस्या  आहेत. जासेकी गरीबी, भ्रष्टाचार आणि अजूनही बरेच काही अश्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे. 

जय हिंद....

      जय भारत ......


हे पण वाचा 👇

शहीद दिन प्रभावी सूत्रसंचालन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या