महात्मा फुले 10 ओळी भाषण | Mahatma Fule 10 Oli Bhashan Marathi

 महात्मा फुले 10 ओळी भाषण



1. महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक आणि विचारवंत होते.

2. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण गावी झाला. 

3. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते.

4. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

5. वयाच्या तेराव्या वर्षी जोतिबांच्या विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला.

6. ई. स. 1848 मध्ये महात्मा फुले आणि सावत्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 

7. त्यांनी निराधार, गोरगरीब, दलित यांना न्याय मिळावा म्हणून 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 

8. त्यांच्या अशाच महान कार्यांमुळे त्यांना समाजाने महात्मा ही उपाधी दिली.

9. दुर्दैवाने 18 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला 

10. आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करणाऱ्या या महान अश्या समाजसुधारकास कोटी कोटी प्रणाम. !


धन्यवाद !

  • अधिक माहिती साठी पुढील व्हिडिओ पहा 👇




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या