डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठीत | Dr. Babaaaheb Ambedkar Marathi Bhashan

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण



सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षवृंद आणि येथे जमलेल्या माझी मित्र मैत्रिणींनो . 

भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.  त्यांचा जन्म 16 एप्रिल ई. स. 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेट म्हणून त्यांचे शिक्षक श्री कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना 'बुद्ध चरित्र' हा स्वलिखित ग्रंथ भेट म्हणून दिला. भीमरावांनी बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते फारसी घेऊन उत्तीर्ण झाले.

भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांनी आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणित कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. मानवधिकार जसे दलित आणि दलित आदिवासींचा मंदिर प्रवेश, पिण्याचे पाणी, अस्पृश्यता, जात, यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे निर्मूलन या मानवी हक्कांसाठी मनुस्मृती दहन (1927), महाड सत्याग्रह (वर्ष 1928), नाशिक सत्याग्रह (वर्ष 1930) येवला की गर्जना (वर्ष 1935), सारखे आंदोलन त्यांनी केले. 

आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून मसुदा तयार केला. त्यासाठी त्यांना 02 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लागला. त्यांच्या अथक परिश्रमाने समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची यामध्ये महत्वाची भूमिका होती म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 रोजी या महान व्यक्तीचे महापरिनिर्वाण झाले. 

धन्यवाद !

जय हिंद...

                            जय भारत ...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या