माझा आवडता प्राणी बिबट्या निबंध | Bibtya Nibandh

 माझा आवडता प्राणी बिबट्या निबंध



  बिबट्या हे एक अतिशय सुंदर आणि शक्तिशाली मांसाहारी प्राणी आहे. आपल्या चपळतेसाठी आणि शिकारीच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला बिबट्या, जगभरातील अनेक जंगलांमध्ये आढळतो. त्याचे वैज्ञानिक नाव 'Panthera pardus' आहे.

            बिबट्याचे शरीर लांबट असते. त्याची त्वचा फिकी पिवळी असून त्यावर काळे डाग असतात. हे डाग प्रत्येक बिबट्यामध्ये वेगवेगळे असतात. त्याचा रंग पिवळा किंवा तपकिरी असतो, परंतु काही प्रजातींचे बिबट्याचा रंग हा काळाही बघायला मिळतो. त्यांचे पाय मजबूत असतात आणि नखे खूप तीक्ष्ण असतात. बिबट्याचे डोळे रात्रीच्या अंधारातही चांगले पाहू शकतात. त्यांच्या डोळ्यांची पुतली खूप मोठी असते, ज्यामुळे त्यांना अंधारात चांगले दृष्टी मिळते. त्याची शेपटी लांब आणि मजबूत असते. त्याचे पंजे खूप तीक्ष्ण असतात. त्यांचा उपयोग  त्याला शिकार पकडण्यासाठी आणि झाडावर चढण्यासाठी होतो. तो ताशी 58 किलोमिटर वेगाने धावू शकतो. बिबट्या हा साधारणतः जंगले, वाळवंट, पर्वत आणि दलदलीची जमीने या राहायला पसंत करतो.

             बिबट्या एक मांसाहारी प्राणी आहे. तो कोल्हे, मेंढ्या, शेळ्या, ससे, हरण, पक्षी तसेच सरपटणारे प्राणी आणि काहीवेळा मोठे प्राणी जसे की गाय, घोडे यांची शिकार करतो. तो एकटा शिकार करतो आणि आपल्या शिकारला झाडावर घेऊन जाऊन खातो. बिबट्या जगभरात विविध ठिकाणी आढळतात. ते आफ्रिका, मध्य आशिया,  भारत आणि चीनमध्ये दिसून येतात. बिबट्याला दृष्टी आणि वासाची उत्तीम जाणीव असते. बिबट्याच्या समूहाला लीप म्हणतात.

             बिबट्या एक एकटा प्राणी आहे. तो दिवसाच्या वेळी विश्राम करतो आणि रात्री शिकारीला जातो. बिबट्या एक चांगला स्विमरही आहे.  मानवी क्रियाकलाप जसे की जंगलतोड, शिकार आणि प्रदूषण यामुळे बिबट्यांची संख्या कमी होत आहे. 

            जगभरात बिबट्याच्या एकूण 9 प्रजाती आढळतात. त्या  प्रजातींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

1. भारतीय बिबट्या

2. आफ्रिकी बिबट्या

3. अमूर बिबट्या

4. श्रीलंकी बिबट्या

5. इंडो चायनीज बिबट्या

6. पर्शियन बिबट्या

7. अरबी बिबट्या

8. जावन बिबट्या

9. काळा बिबट्या


अधिक माहिती साठी पुढील व्हिडिओ पहा 👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या