दसरा निबंध | माझा आवडता सण दसरा
दसरा हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीला साजरा केला जातो. दसरा हा शौर्य आणि पराक्रमाचा सण आहे. दसरा म्हणजे विजयाची कथा, या दिवशी भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला, म्हणून हा सण विजयादशमी या नावानेही ओळखला जातो.
दसरा सणाच्या पूर्वी नवरात्रीच्या काळात देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, भक्तजन देवीची आराधना करतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचा प्रतीकात्मक वध केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी रावणाच्या पुतळ्यांची रचना केली जाते आणि संध्याकाळी त्यांचा वध करण्याची परंपरा आहे.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. या दिवशी लोक नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. दसऱ्याच्या दिवशी व्यापारी तसेच विद्यार्थी आपल्या वह्या - पुस्तकांची पूजा करतात तसेच वाहनांची व शस्त्रांचीही पूजा या दिवशी केली जाते. घरात गोड पदार्थ बनविले जातात.
या सणाच्या दिवशी दरवाजाला पणाफुलांची तोरणे बांधली जातात. तसेच एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात. एकमेकांना 'सोने घ्या सोन्यासारखे रहा' असे म्हणतात.
दसरा सण आपल्याला विजयाची, समर्पणाची आणि एकतेची शिकवण देतो. असा हा सण सर्वांनाच खूप आवडतो.
तसेच तुम्ही खालील व्हिडिओ बघू शकतात 👇
0 टिप्पण्या