झेब्रा प्राणी माहिती - निबंध
झेब्रा हा आफ्रिकेच्या सवाना प्रदेशात आढळणारा एक अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण जंगली प्राणी आहे. जो थंड आणि मोकळ्या वातावरणात राहणे पसंत करतो. हे प्राणी जास्त करून पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात. त्यांच्या शरीरावर असणारे काळे आणि पांढरे पट्टे हे त्याचे एक वैशिष्टय आहे. या पट्ट्यांचे नक्की काय काम असते, याबाबत अनेक सिद्धांत आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते, हे पट्टे कीटकांपासून संरक्षण करतात, तर काही म्हणतात की हे पट्टे एकमेकांना ओळखण्यासाठी मदत करतात.
मैदानी झेब्राची शरीराची लांबी सहसा 85 ते 97 इंच एवढी असते. तर त्याचे वजन हे 175 ते 300 किलो एवढे असते. झेब्रा हा ताशी 50 किलोमिटर इतक्या वेगाने धावू शकतो. झेब्र्याची शिकार प्रामुख्याने सिंह व इतर प्राणी करतात. स्वतःचा बचाव करण्यासाठी ते चावतात आणि लाथ मारतात. झेब्रा हा एक शाकाहारी प्राणी असू तो मुख्यतः गवत आणि शेंडे खातो, परंतु कधी कधी झाडाची साल, पाने, कळ्या, फळे आणि मुळे खातात.
झेब्रा हा प्राणी समूहात राहणे पसंत करतो. ज्यामध्ये अनेक नर आणि मादी असतात. झेब्राचे पिल्लू हे अगदी जन्माला आल्यावर 2 तासातच धावायला सुरुवात करते. झेब्रा हा प्राणी थंड वातावरण राहायला पसंत करतो, त्यामुळे तो पलायन करत राहतो.
झेब्राच्या सध्या तीन प्रजाती जिवंत आहे, त्या म्हणजे ग्रेव्हिज झेब्रा, मैदानी झेब्रा आणि माउंटन झेब्रा. यातील ग्रेव्हिज झेब्रा हा प्रामुख्याने केनिया आणि इथिओपियाच्या काही भागात राहतात.पर्वतीय झेब्रा नामिबिया, अंगोला आणि दक्षिण आफ्रिकेच्या पर्वतीय प्रदेशात राहतात. मैदानी झेब्रा हा केनिया, टांझानिया, बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेत या ठिकाणी पाहायला मिळतात, ही सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे.
शेती आणि पायाभूत सुविधांच्या विकासासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे वस्तीचे नुकसान, त्यांच्या अस्तित्वासाठी एक महत्त्वपूर्ण धोका आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या मांस आणि चामांसाठी बेकायदेशीर शिकार, तसेच संसाधनांसाठी पशुधनाशी स्पर्धा, हा एक चीतेचा विषय राहिला आहे. संरक्षित क्षेत्रांची स्थापना आणि संवर्धन कार्यक्रमांद्वारे झेब्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय उद्याने आणि राखीव जागा त्यांच्या निवासस्थानांचे रक्षण करण्यात आणि शाश्वत व्यवस्थापन पद्धतींना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
तसेच तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता 👇
0 टिप्पण्या