23 नैसर्गिक आपत्ती स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
तुमचे गाव डोंगरावर आहे. डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे.
👉
- डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावातील लोकांना डोंगरावरच्या गावात लवकरात लवकर आणणे.
- त्यांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा तसेच त्यांना हवी असलेली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी.
(आ) जरा डोके चालवा.
(१) पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित अपत्तींचे कोष्टक दिले आहे. ते पूर्ण करा. त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या. (1) चक्रीवादळ (2) मोडकळीला आलेले घर कोसळणे (3) वीज कोसळून त्यात मरणे (4) दोन अगागड्यांची टक्कर होणे (5) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे (6) जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे (7) स्वयंपाकाचा सिलिंडर फुटून आग लागणे. (8) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे
👉 नैसर्गिक आपत्ती
- चक्रीवादळ
- वीज कोसळून त्यात मरणे.
- पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे .
- जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे.
मानवनिर्मित आपत्ती
- मोडकळीला आलेले घर कोसळणे.
- दोन अगागड्यांची टक्कर होणे
- स्वयंपाकाचा सिलिंडर फुटून आग लागणे.
- विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे.
(इ) माहिती मिळवा.
मोठ्या शहरांमध्ये अग्निसुरक्षा दले असतात. त्यांच्याविषयी माहिती मिळवा. त्या दलातले सेवक कोणकोणत्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात त्याची यादी करा. मिळालेली माहिती वर्गातील इतरांना सांगा.
👉 आग विझविण्यासाठी आधुनिक साधनांचा मदतीने जे सुरक्षारक्षक काम करतात त्यांच्या समूहाला अग्नीसुरक्षा दल असे म्हणतात. अग्णीसुरक्षा दलातील सेवक आग विझविण्यासाठी इमारत कोसळणे, वायू गळती, तेल गळती तसेच एकाध्या ठिकाणी भीषण अपघात होऊन आग लागणे या सर्व ठिकाणी ते नागरिकांची मदत करतात.
(उ) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात ?
👉 आपल्या देशातील पाऊस ठराविक काळातच पडत असल्यामुळे आपल्या देशातील पावसाला मोसमी पाऊस असे म्हणतात.
(२) हिवाळ्यातला कोणत्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो ?
👉 हिवाळ्यातील शिडकाव्याच्या प्रकारचा पाऊस पिकांसाठी चांगला असतो.
(३) गारपिटाचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत ?
👉
- गरपिटांमुळे माणसे व जनावरे गारांचा मार लागून जखमी होतात.
- घरांच्या कौलांवर गारा पडल्यामुळे कौल फुटतात.
- गारांच्या माऱ्यामुळे शेतातील धण्यापिकांचे व फळांचे नुकसान होते.
(४) पुराच्या पाण्यात पोहावे का ?
👉 पुराच्या पाण्याचा ओढ खूप असतो. पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचा धोका असतो त्यामुळे अशा वेळी पुराच्या पाण्यात पोहू नये.
(५) त्सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनांवर काय परिणाम होतो ?
👉 किनाऱ्यावर असणारी वाहने तसेच त्यात बसलेली माणसे त्सुनामीमुळे दूर फेकली जातात. वाहनांची जबरदस्त मोडतोड होते. आत बसलेली माणसे मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात.
(ऊ) गाळलेले शब्द भरा.
(१) पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात.
(२) पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते.
(३) त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात.
(४) त्या ढिगाऱ्यात अडकून माणसे दगावतात.
हे पण वाचा 👇
22 वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1
24 आपण परिसर धोक्यात आणत आहोत का ? स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1
0 टिप्पण्या